श्रीरामपुर (दि.११.जानेवारी) शहरात रॉयल ग्रुपच्यावतीने यांच्या वतीने ब्लँकेट (चादर) व अन्नदान वाटप करण्यात आले.राज्यात सर्वत्र कडाक्याच्या थंडीची लाट पसरली असताना रॉयल ग्रुपच्यावतीने रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपणाऱ्या गोरगरीबांना ब्लँकेट,गरम कपड्यांचे वाटप तसेच जेवण वाटप करून एकप्रकारे मायेची ऊब दिली आहे. थंडीने कुडकुडणाऱ्या १०० गरजूंना समाजभान जपणाऱ्या रॉयल ग्रुपच्यावतीने पांघरूण दिल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

श्रीरामपुरातील शहरात व इतर भागात भीक मागून पोट भरणाऱ्या गोरगरीबांना राहण्यासाठी निवारा नसल्याने ते फुटपाथवरच संसार थाटून तिथेच झोपतात. थंडीत एखादी जुनी चादर अंगावर घेऊन ते कशीबशी रात्र काढतात. पहाटे शेकोटी करून थंडीवर मात करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आपण निवारा देऊ शकत नाही, मात्र उबदार कपडे देऊ शकतो, या लोकभावनेतून कलीम वेल्डर यांच्या रॉयल ग्रुपने गरीबांना ब्लॅंकेट व जेवण वाटप केले

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीरामपूर नगर परिषद चे नगरसेवक हाजी अंजुम शेख, सोहेल दारूवाला, राहुल शिंपी, विराज आंबेकर, कलीम कुरेशी, रज्जाक पठाण तसेच धरणग्रस्त सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) महिला प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. सिंन्ड्रेला टोणी परेला अकबर सय्यद या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला

याप्रसंगी रॉयल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कलीम वेल्डर या अय्याज भाई,बाबू शेख ,उदय कासार,रमजान पटेल, असपाक तांबोळी आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

रॉयल ग्रुप अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here