श्रीरामपूर/प्रतिनिधी (संदिप आसने) :- देव संत व गुरूवर निष्ठा असावी पण ती निष्ठा निसटती नसावी गुरूचा कोणताही शब्द मंत्र हा मानवी जीवाला सुख-समाधान देणारे असतात तेव्हा जीवन जगत असताना सदैव भजन नामस्मरण चिंतन करा चिंता करू नका असा उपदेश श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी भामाठाण येथे श्री दत्त मंदिर सभागृहात आयोजित प्रवचन महोत्सवात भाविकांना केला.
जीवनात दिवा लावणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे तर दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे अज्ञानरूपी दिवा नष्ट करण्यासाठी ज्ञानरूपी दिवा लावावा असे ज्ञानरूपी दिवे लावणारी परंपरा संतांनी घालून दिले आहे तसे ज्ञान संत देतात भगवंता पेक्षा संत या जगात सर्वश्रेष्ठ आहे या जगामध्ये वरण कुणालाही चुकवता आले नाही देवाने काही काळ आपल्याला जीवन जगण्याची संधी दिली कर्म चांगले करा कर्मानुसार फळ आपल्याला निश्चित मिळेल सत्कर्म कामाला येते या जगात ईश्वर सत्य आहे अहंकार मीपणा मानसाला दुख: देत असते.
सद्गुरू नारायण गिरी महाराजांच्या अंगी मी पणा नव्हता त्यांचा आध्यात्मिक अभ्यास मानवी जीवनावर प्रकाशझोत टाकणारा होता त्यामुळे सद्गुरू नारायणगिरी महाराजांवर परिसराची श्रद्धा आहे माणसांमध्ये भेद न केल्यामुळे या युगामध्ये ते सर्वश्रेष्ठ तर साक्षात देव होऊन गेले असा उपदेश स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी यावेळी भाविकांना केला या समारंभास ह.भ.प. मधुकर भराडी रामभाऊ घोरपडे धनक बाबा कैलास महाराज दुशिंग पोलीस पाटील मधुकर बनसोडे भाऊसाहेब बनसोडे रामनाथ सांगळे अण्णासाहेब आसने यशवंत हुरुळे,रंगनाथ वरपे लखन महाराज दादासाहेब बनसोडे अशोक बनसोडे किशोर बनसोडे राजू बनसोडे संजय बनसोडे पत्रकार विठ्ठलराव आसने, संदीप आसने यासह आदी मान्यवर उपस्थित होते.