श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभाचे आयोजन
श्रीरामपूर (प्रतिनिधी संदिप आसने) श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे आज दि.14 रोजी मकर संक्रांतीनिमित्त सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे प्रवचन होणार आहे.
सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपेने संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा मकर संक्रांतीच्या निमित्ताने दिवसभर तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने खंडाळा येथील बाळासाहेब नगरकर नानांच्या स्मृतिदिनी भाविकांना नगरकर परिवाराकडून भोजन देण्यात येणार आहे तरी परिसरातील भाविकांनी या तिळगुळ समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास महाराज दुशिंग,सोमनाथ महाराज भागवत,लखन महाराज,पंकज महाराज खाडे यांनी केले आहे.