बेलापुर/प्रतिनिधी(देविदास देसाई) – बेलापुर खूर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने रस्त्यावर सापडलेला नऊ कोटी रुपयाचा धनादेश बँकेला परत केला त्या शिक्षकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

या बाबत सविस्तर माहीती अशी की केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक जालींदर विटनोर हे शाळेच्या कामानिमित्त उच्च माध्यमिक मडंळ पुणे येथे गेले होते शाळेचे कामकाज आटोपुन रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या पायाने एक कागद उडाला तो कागद त्यांना चेक साराखा वाटला त्यामुळे त्यांनी तो उचलुन हातात घेतला तर तो खरोखरच चेक होता अन तो ही चक्क नऊ कोटी रुपयाचा १३ जानेवारी २०२१ रोजी दिलेला चेक हा बँक आँफ महाराष्ट्र शाखेतुन एल आय सी कार्यालयासाठी देण्यात आलेला होता

त्यांनी ही घटना तातडीने विद्यालयाचे प्राचार्य सोपान मगर व आपले नाशिक येथील नातेवाईक डाँ नवनाथ तमनर यांना कळविली दोघांनीही तो चेक महाराष्ट्र बँकेच्या शाखेत नेवुन देण्याचा सल्ला दिला तो चेक घेवुन विटनोर हे महाराष्ट्र बँकेच्या शिवाजी नगर येथील शाखेत गेले तेथे गेल्यावर बँकेचे शाखाधिकारी कुलकर्णी यांना या बाबत माहीती देताच त्यांना फार आंनद झाला त्यांनी तातडीने सर्व स्टाफची बैठक बोलविली बैठकीत जालींदर विटनोर यांनी बँकेचे महाप्रबंधक सी एन कुलकर्णी व शाखाधिकारी पी एच पारख यांच्याकडे तो सापडलेला नऊ कोटी रुपयाचा धनादेश सुपूर्त केला सर्वांनी जालींदर विटनोर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल टाळ्याच्या गजरात कौतुक करुन बँकेच्या वतीने विटनोर यांचा सत्कार करुन त्यांना गिफ्टही देण्यात आले या वेळी बँकेचे महाप्रबंधक सी एन कुलकर्णी म्हणाले की हा धनादेश बँक आँफ महाराष्ट्र एम्प्लाँइज पेंशन ट्रस्टच्या वतीने एल आय सी ला देण्यात आलेला होता पर रस्त्याने जाताना हा चेक गहाळ झाला होता विटनोर सरांनी प्रामाणिकपणे तो चेक आणुन दिला त्या बद्दल शाखेच्या वतीने त्यांचे कौतुक करतो असेही कुलकर्णी म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here