श्रीरामपूर/प्रतिनिधी :- गावाच्या विकासासाठी गोदावरी ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांना विजयी करा राहुल चोरमल यांनी महांकाळवाडगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गोदावरी ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, महांकाळवाडगावच्या सर्वांगीण विकासासाठी गोदावरी ग्रामविकास मंडळाचे उमेदवार कटिबद्ध असुन सर्व उमेदवार हे सुशिक्षित आहे. गावाचा विकास करण्याची क्षमता सर्व उमेदवारांमध्ये आहे. गावाच्या विकासासाठी आपले उमेदवार मंत्रालयात जाऊन कामे मंजुर करुन आणु शकतात त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गोदावरी ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here