श्रीरामपूर/प्रतिनिधी (स्वप्निल सोनार) :- या जगामध्ये मंदिरे अनेक आहे ती बांधली गेली आहे इथे काहीही नसताना सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपेने भव्य मंदिराची उभारणी केली परंतु श्रीराम प्रभूच्या अश्रूंची तपशीळा ही येथे प्राचीन असून हा एक चमत्कार आहे असे विचार श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी संस्थान येथे प्रवचनात भाविका समोर मांडले.

सालाबाद प्रमाणे सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपेने आणि स्वामी अरुणनाथगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभ यावर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी आयोजित प्रवचनात महाराज बोलत होते भक्तीचा गुळ ज्ञानाचा तीळ याच्या एकोप्यातून गोडवा निर्माण होऊन त्याला आकार व तो दिसायला सुंदर आकर्षक होतो त्यासाठी प्रेम भक्ती महत्त्वाची आहे आपण कितीही मोठे झालो ज्ञानी झालो तरी चालणार नाही त्यासाठी साधू संत संगत त्यांची सेवा त्यांचे चरित्र आत्मसात करणे आज काळाची गरज आहे. संत सेवा आणि भक्ती असेल तर मानवी जीवाला सुख समाधान मिळते अडबंगनाथ भूमी ही नाथांची भूमी आहे येथे येण्यास पूर्वजन्मीचे भाग्य असावे लागते तर येणारे भाग्यवान आहे त्या जीवाला पुण्य मिळते व पाप नष्ट होते पंढरीच्या पांडुरंगा प्रमाणे अडबंगनाथ तपोभूमी ही नाथांची सर्वश्रेष्ठ भूमी आहे येथे अडबंगनाथांनी बारा वर्ष तपश्चर्या केली माणिक नावाच्या शेतकऱ्याला गुरु गोरक्षनाथ यांची कृपा झाली म्हणून माणिक शेतकऱ्याचा अडबंगनाथ प्रकट झाले सद्गुरू नारायण गिरी महाराजांची माझ्यावर कृपा झाल्याने मी अरुणचा अरुणनाथगिरी झालो या भूमीत अडबंगनाथांची सेवा करण्यास संधी प्राप्त झाली हे मी माझे भाग्य समजतो प्रेम भक्ति देणारे या जगात संतच आहे संसाराचे ताप नष्ट करण्याची ताकद साधुसंत देवांमध्ये आहे मात्र त्याग केल्याशिवाय मानवी जीवाला सुख समाधान मिळत नाही जीवन जगत असताना आपण कर्म चांगले करा यश हमखास आहे त्यासाठी देव साधू संतांचे चरण धरा व त्यांचे सेवा करा असा उपदेश स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी यावेळी भाविकांना केला खंडाळा येथील नगरकर परिवाराकडून भाविकांना भोजन देण्यात आले व महाराजांचे संत पूजन केले या समारंभास नवनाथ आहेर शेठ,अर्जुन भाई पटेल, शाम पुरनाळे, सुलोचना पटारे,तरकसे बाबूजी,गोरक्षनाथ साबदे,बबनराव आघाडे,गोकुळदास आढाव,बबलू राजपाल,मनोज नगरकर,भगवान काळे,रमेश पारखे,बाळासाहेब वर्पे,राजेंद्र कोकणे,राजेंद्र घुमे,राहुल महाराज चेचरे,विकास महाराज यादव,भागवतराव चोळके,भाऊसाहेब वाबळे,भाऊसाहेब मुठे,पोलीस पाटील मधुकर बनसोडे,अशोक मुठे,योगेश नगरकर,विनायक नगरकर,कैलास महाराज दुशिंग,लखन महाराज,सोमनाथ महाराज,सिताराम घोरपडे,पंकज महाराज,पत्रकार विठ्ठलराव आसने,स्वप्नील सोनार,संदीप आसने गोविंद जासूद यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here