श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील दोघींनी मालेगाव येथील एका विवाहित महिलेस केटरींगच्या कामासाठी बोलावून त्या विवाहीत महिलेला चक्क इंदौर येथे १ लाख २० हजार रूपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ‘मोतीनगर भागात राहणाऱ्या एका तरूणाने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अनिता रविंद्र कदम ( रा.आंबेडकर वसाहत, दत्तनगर, श्रीरामपूर) व अनिता कदम हिची मैत्रिण संगिता ( पूर्ण नाव माहित नाही). या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्या तरूणाने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, माझ्या पत्नीला केटरिंगच्या कामासाठी आमच्याकडे येवु द्या, यासाठी तिला फुस लावून आणले. त्यानंतर अनिता कदम व संगीता यांनी तिला मध्यप्रदेशातील इंदौर येथे नेवून अज्ञात व्यक्तीकडून १ लाख २० हजार रुपये घेवून तिला त्या इसमाच्या ताब्यात दिले. या घटने मुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन याठिकाणी ३६६ (कायदेशीर दंड कायदा) कलम ३७०,३७१ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून, या प्रकरणी एक आरोपी ताब्यात घेतला असून इतर आरोपींच्या शोध घेण्याकरिता पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास भा. पो. से. आयुष्य नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट हे करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here