श्रीरामपुर/प्रतिनिधी :- जवळपास ८ महिन्यांच्या काळात लॉकडाऊन करण्यात असल्याने, शेतकरी , छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून. एकीकडे आपले पोट कसे भरावे या विवंचनेत नागरिक असतांना. नागरिकांना वीजबिल माफी देण्या एवंजी, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सक्तीने वीजबिल वसुलीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध स्वरूपाचे आंदोलने केली जात असतांना, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर याठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ,चड्डी बनियन आंदोलन करण्यात आले. सदरचे आंदोलन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्षतिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून. यावेळी राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील सरसकट वीजबिल माफी करावी अशा मागणीचे निवेदन महावितरण कार्यालय श्रीरामपूरच्या आधिका-यांना दिले. आम आदमी पार्टीच्या या अभिनव आंदोलनास, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, युवा अध्यक्ष अक्षय कुमावत, यशवंत जेठे, भैरव मोरे, भरत डेंगळे, अक्षय पवार, सागर देवकर,अभिजित राऊत, दीपक परदेशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here