श्रीरामपुर/प्रतिनिधी :- राज्य सरकारच्या पुढाकाराने प्राथमिक स्थरावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरवात करण्यात आली असून. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याकरिता, आलेल्या पहिल्या ३०० कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या लसीकरनास, आजपासून ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर याठिकाणी सुरवात करण्यात आली. ज्यात आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच डॉक्टरांना, ही लस देण्यात येणार असून, या लसीकरणाची सुरवात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी लस घेऊन केली. यावेळी अस्तिरोग तज्ञ डॉक्टर प्रशांत चव्हाण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.