भेर्डापूर(वार्ताहर) :- माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्राईड अकॅडमी इंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनि. कॉलेज, वांगी-भेर्डापूर महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या इयत्ता ११ वी व १२ वी वर्गांसाठी भूगोल व आय. टी. विषयासह एच. एस. सी. बोर्ड, पुणे यांची संलग्नता प्राप्त झाली आहे. याविषयीचे संलग्नता पत्र महाविद्यालयाचे प्राध्यापक सुरेश कोकणे यांच्याकडे श्रीरामपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे समवेत गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, कृषी अधिकारी आर. बी. कडलक, पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे, प्रा. राजेंद्र गुजर, प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीतीत प्रदान करण्यात आले.

मागील वर्षी नव्याने प्राईड अकॅडमी ज्युनि. कॉलेजची सुरुवात झाली. इयत्ता १२ वीच्या वर्गाची ही प्रथम बॅच असून पंचक्रोशीतून महाविद्यालयात प्रवेशित झालेले विद्यार्थी यावर्षी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी सहभागी होणार आहे.

माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे व प्राईड महाविद्यालयाच्या संस्थापिका तथा विद्यमान पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी भेर्डापूर-वांगी भागात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करून पालकांच्या आग्रहास्तव कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय सुरु केले आहे. या कनिष्ठ महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र विभागाने संलग्नता देवून इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी गणित व जीवशास्त्र या विषयास भूगोल हा पर्यायी विषय दिलेला आहे तसेच मराठी विषयास पर्याय म्हणून माहिती तंत्रज्ञान हा विषयदेखील उपलब्ध करून दिलेला आहे. पर्यायी भूगोल विषय उपलब्ध करून देणारे श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्यातील महत्वाचे महाविद्यालय आहे. डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक प्रशांत जाधव यांनी संलग्नता व सांकेतांक मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. समस्त पालक वर्ग, हितचिंतक व नागरिकांकडून मुलींच्या शिक्षणास उत्कृष्ट पर्याय उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. वंदनाताई मुरकुटे व ज्ञानेश्वर मुरकुटे यांचे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here