श्रीरामपुर/प्रतिनिधी :- राष्ट्रीय संत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यावर, अयोध्येतील राम मंदिर निर्माण कार्याच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्या नंतर ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर याठिकाणी जामा मशिद याठिकाणी मुस्लिम बांधवांनी,राम मंदिर निर्माणा करिता, ५१ हजार रुपयांची राशी,गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या कडे मशिदीमध्ये सुपूर्त केली यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना, राम मंदिराचा कार्य हे एखाद्या धर्माचे पंथाचे भाषेचा एखाद्या प्रदेशाचं किंवा एखाद्या संप्रदायात किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा काम नाहीये संपूर्ण राष्ट्राचे काम आहे म्हणून या राष्ट्राचे घटक असलेले आमचे आमच्या बेलापूर गावातील मुस्लिम बांधव त्याकरीता पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पहिला त्याचा आरंभ करतो ५१ हजार रुपये त्यांनी सर्वांनी मिळून दिले. व त्यांनी  सांगितलं की आम्हाला वेळ कमी पडला नाही तर मला आकडा दहा लाखापर्यंत वाढवायचा आहे. सर्वांनी मशिदीमध्ये नेऊन सत्कार करून ही राशी अर्पण केली आणि फार उत्तम त्यांनी भाषणही केले. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेच प्रतीक उभा राहील असा आमचा विश्वास दृढवला आहे असे मत राष्ट्रीय संत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी श्रीरामपूर येथे व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here