श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील २६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान १५ जानेवारी झाले होते त्याचा निकाल आज स्पष्ट झाला असून श्रीरामपुर तालुक्यात मनसेने आपले खाते उघडले असुन मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने चांगली मुसंडी मारली असुन तीन ग्रामपंचायत मध्ये सात उमेदवार विजयी झाले आहे.

राज्यातल्या १२७११ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी झाली असुन. आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित झाले. राज्यात १४२३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता पण काही ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली तर काही ठिकाणी मतदान होऊ शकलं नाही. त्यामुळे शुक्रवारी १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. तर आता सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहे.

उमेदवारांसह मतदारदेखील निकालाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान श्रीरामपुर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत मनसेने बाजी मारत प्रस्थापितांचा पराभव केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने ७ उमेदवार विजय मिळवल्यानंतर मातुलठाण ग्रामपंचायत ४ जागांवर पुरणपूर २ जागेवर तर महाकाळ वडगाव १ जागेवर मनसेनेचे सोनवणे सुभाष आण्णासाहेब, मोरे बबन एकनाथ, बोर्डे जयश्री सोमनाथ, कणसे सुवर्णा आकाश सर्व मातुलठाण, राहुल दातीर महांकाळ वाडगाव तर पारखे मनीषा प्रकाश, पारखे शिल्पा रवींद्र पुरणपूर यांचा विजय झाला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा सरचिटणीस संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, मनसे शहराध्यक्ष गणेश दिवसे.मनविसे उपजिल्हाध्यक्ष उदय उदावंत, मनविसे तालुकाध्यक्ष राहुल दातीर. मनविसे शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, मनसे तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येळे. शहर सचिव स्वप्नील सोनार. शहर संघटक निलेश सोनवणे, शहर उपाध्यक्ष संतोष आवटी, बाबासाहेब भालेराव, तालुका मनविसे सरचिटणीस सोमनाथ कासार, मनविसे शहर सरचिटणीस संकेत शेलार, मनविसे उपशहर अध्यक्ष मृत्युंजय रुद्राक्ष. नंदू खेमनर. दादासाहेब कुसेकर. आदी मनसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here