श्रीरामपूर/प्रतिनिधी :- तालुक्यातील दत्तनगर येथील दोघींनी मालेगाव येथील एका विवाहित महिलेस केटरींगच्या कामासाठी बोलावून त्या विवाहीत महिलेला चक्क इंदौर येथे १ लाख २० हजार रूपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता त्या अनुषंगाने

समजलेल्या माहिती वरून शेखर साहेबराव खैरणार याचे फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पो स्टे  येथे गुरनं 29/2021भादवि कलम 366,370,371 प्रमाणे दि 14/01/2021 रोजी गुन्हा दाखल केला होता सदरील गुन्ह्याचे तपास करत असताना  आरोपी विरोधात भक्कम पुरावा असल्याने आरोपी 1) अनिता रविद्र कदम रा दत्तनगर श्रीरामपूर हीस अटक केली होती. पुढील तपासात असे निष्पन्न झाले की दि 09/12/2020 रोजी अनिता कदम व कुंदाबाई या दोन्ही महीलांनी मुलगी नामे सुजाता खैरणार व ज्योती ब्राम्हणे दोन्ही रा श्रीरामपूर या मुलीना श्रीरामपूर येथून औरंगाबाद येथे नेवून तेथे सांगीतले की तुम्हचे आम्ही लग्न लावून देतो त्या बदल्यात तुम्हाला प्रत्येकी 40 हजार रुपये देतो त्या पैशाचे लालसेने सदरील मुली लग्नासाठी तयार झाल्याने औरंगाबाद येथील महीला संगीता व श्रीरामपूर येथील अनिता व त्याचे साथीदार यांनी सदरील मुलीना इंदोर येथे नेवून समोरील पार्टीकडून पैसे घेवून ज्योती ब्राम्हने हीचे लग्न लावून दिले व दुसरी मुलगी सुजाता खैरणार हीचे लग्न देविच्या मंदिरात नेवून लावले व एका खाजगी वकीलाकडे घेवून जावून सुजाताचे नाव बदलून कविता चौहान ठेवून तिचा पत्ता धरमपूर इंदोर असा बनावट सांगून त्याचे नोटरी करुण दिली.सदर लोक सुजाता हीस घेवून चंदेरी मध्यप्रदेश येथे घेवून गेले होते

त्यानंतर ज्योती ब्राम्हने ही तिचे सासर इंदोर येथे त्यांची नजर चूकवून श्रीरामपूर येथे पळून आली आहे.तसेच यातील आरोपी कुंदाबाई हीने जयश्री ठोबरे रा कोल्हापूर हिचे देखील असेच मंगळाणी ता नांदगाव जि नाशिक येथे असे खोटे लग्न लावून दिले असल्याचे समोर आले आहे.

या सगळ्या तपासावरुन पोलीस सहाय्यक निरीक्षक कृष्णा घायवट यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून श्रीरामपुर शहर पो स्टे ला गुरनं 44/2021 भादवि कलम 420, 465, 468, 471, 34 प्रमाणे आरोपी नामे अनिता रविद्र कदम रा दत्तनगर श्रीरामपूर 2) कुंदाबाई शिंदे रा पाटाच्या कडेला,सरस्वती काँलणी जवळ श्रीरामपूर 3) संगीता (पूर्ण नाव माहीत नाही) रा औरंगाबाद 4) मामा (पूर्ण नाव गाव माहीती नाही) 5) आरती (पूर्ण नाव माहीती नाही) रा अकोला 6) चंदर रा बु-हानपूर (पूर्ण नाव गाव माहीती नाही) 7) जिवन रा इंदोर (पूर्ण नाव गाव माहीती नाही) 8) सुजाता शेखर खैरनार व 9) ज्योती सायमन ब्राम्हने 10) जयश्री ठोबरे रा कोल्हापूर या दहा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदरील गुन्हयातील आरोपी नामे 1) सुजाता शेखर खैरनार 2) ज्योती सायमन ब्राम्हने 3)जयश्री ठोबरे यांना अटक करण्यात आली असून 4) अनिता रविद्र कदम हीस देखील न्यायालयीन कोठडी मधून सदरील गुन्हयात वर्ग करण्यात आला यामध्ये अजुन टोळी कार्यरत आहे अशी खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. सदर गुन्हेचा पुढील तपास पुढील पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधीक्षक अनिल मिटके भा पो से आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांच्यासह पो. हेड कॉ जोसेफ साळवी, पो. हेड कॉ किशोर जाधव, पो. हेड कॉ पंकज गोसावी, पो. कॉ महेंद्र पवार, महिला पो कॉ कांबळे, पो.कॉ.सुनिल दिघे, पो. कॉ. आहिरे या कामगिरीनंतर श्रीरामपुर पोलिसांचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here