श्रीरामपूर :- ( प्रतिनिधी) :- भा. पो. से. पोलीस प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री.आयुष नोपाणी यांनी श्रीरामपूर शहरातील तीन महिन्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ उत्कृष्टपणे पूर्ण केला शहरात कायदा व सुव्यवस्था दृढ करण्याकरिता त्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची काळजी घेतली विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात शहर व परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले होते. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले होते. आज रोजी त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करून श्रीरामपूरकरांचा निरोप घेतला. यावेळी त्यांना निरोप देणे करिता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील व श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक सौ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक श्री. संदीप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. खान साहेब आदींची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री.आयुष नोपाणी यांनी गेल्या तीन महिने उत्कृष्टपणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कामकाज पाहिल्याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्हा अध्यक्ष असलम बिनसाद, स्वप्नील सोनार, फकीर मोहंमद शेख, देविदास देसाई, जयेश सावंत, सुभाषराव गायकवाड, अमन शेख, शहबाज पठाण, रुषीकेष पोल.सचीन केदार, रोहित भोसले,युनूस इनामदार, हर हर ,अमोल शिरसाठ, अँड.डोके, अकबर भाई शेख, अमीर बेग मिर्झा, राजमोहंमद शेख, कलीम बिनसाद, मोहसीन शेख,आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र लघु उत्त पत्र व पत्रकार संघ च्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती करण्यात आली की श्रीरामपूर शहरासाठी असाच निर्भीड व कर्तव्यदक्ष अधिकारी द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here