श्रीरामपुर (वार्ताहर) तालुक्यातील वांगी-भेर्डापूर येथील प्राईड अकॅडमी इंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी कोडींग विषय व महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी भव्य अश्या प्रयोगशाळेचे उद्घाटन लीड कंपनीचे जितेंद्र मितबावकर यांचे हस्ते माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे व प्राईड अकॅडमी संचालिका तथा श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या उपस्थितीत पार पडले.

प्राईड अकॅडमी ही शिक्षण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जदार शिक्षण देत असताना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देते. आत्ताच आलेल्या शासनाच्या जी. आर नुसार कोविड नंतर शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी शाळा सुरु करणे संदर्भात पालकांशी चर्चा करण्यात आली. पालक संमती बैठकीत इयत्ता १ ली पासून कोडींग हा नवीन विषय सुरु करणे संबंधात घोषणा करण्यात आली. कोडींग विषय हा पूर्णपणे डिजीटल प्रणालीद्वारे शिकविला जाणार आहे. प्राईड अकॅडमी ही कोडींग विषय सुरु करणारी तालुक्यातील पहिली शाळा आहे.

संस्थेने सुरु केलेल्या ज्युनिअर कॉलेजच्या प्रयोगशाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या नव्याने सुरु केलेल्या ज्ञानदानाच्या यज्ञात विद्यार्थी सहभागी होणार आहे. याप्रसंगी माऊली मुरकुटे, डॉ. वंदनाताई मुरकुटे, प्राचार्या प्रीती गोटे, प्राध्या. सुरेश कोकणे, प्राध्या. राजेंद्र गुजर, समन्वयक जया छतवाणी, सागर आहेर, दिलीप गालफाडे, शुभांगी चौधरी, महेश शिंदे, प्रशांत जाधव, अस्मिता देवरे, सुमैया शेख, मीरा पवार, अश्विनी जगताप, मंजुषा कुलकर्णी, प्रताप कवडे, बाळासाहेब दांगट, विशाल उंडे, रमेश साळे, अप्पासाहेब पवार, प्रमोद पवार, बाळासाहेब आढाव, जगन्नाथ जगताप, लखन जगताप, विष्णू जगताप, प्रशांत लबडे, उत्तम जाधव आदि पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हे अस्मिता देवरे यांनी तर श्वेता भिंगारदिवे यांनी आभार प्रदर्शन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here