जगभरात सुमारे ११०० ठिकाणावर एक दिवशीय कृषी सप्ताहाचे आयोजन

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- गौरव डेंगळे

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी, कृषिशास्त्र विभागांतर्गत आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून २२ ते २८ जानेवारी दरम्यान १० व्या जागतिक कृषी महोत्सव सप्ताहाचे आयोजान संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्य व परदेशात देखील करण्यात आले आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्वप्रकारचे नियम पाळून थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच छोटेखानी कृषीमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी नाशिक येथे आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक कृषीमहोत्सवमध्ये लाखो शेतकऱ्यांची उपस्थिती व सहभाग असल्याने यंदाच्या कृषी महोत्सवामध्ये  गर्दी टाळण्यासाठी, परदेशासह , परराज्य आणि महाराष्ट्रात सुमारे ११०० ठिकाणी या कृषी महोत्सव सप्ताहाचे अतिशय शिस्तबद्ध आयोजन करण्यात येत आहे.

देशात प्रथमच होणाऱ्या या अनोख्या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कमी पाण्यावरील व कमी खर्चातील शेती, घरगुती खते-औषधे बनविण्याचे प्रशिक्षण, शेतीपूरक जोडधंदे, देशी गायींचे संवर्धन व पशुपालन, शेतीतून स्वयंरोजगार, शेतीसाठी योग्य बाजारपेठ, याबरोबरच विविध कृषीतज्ञांचे चर्चासत्र युट्युब चॅनेलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे तसेच  शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी ऑनलाईन वधू – वर परिचय मेळावे देखील आयोजित केले असल्याची माहिती जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक श्री आबासाहेब मोरे यांनी दिली.

जागतिक कृषी महोत्सव सप्ताह पूर्वतयारी:
जागतिक कृषीमहोत्सव सप्ताहामध्ये गावपातळीवर होणारे सर्व कार्यक्रमांचे नियोजन एकदिवसीय स्वरूपाचे असणार आहे. मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन जागतिक कृषीमहोत्सवाचे नियोजन सुरु आहे. कृषी विषयक विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या तज्ञांच्या भेटी घेऊन चर्चा सत्रांचे नियोजन केले जात आहे. जागतिक कृषी महोत्सवाच्या नियोजनासाठी महाराष्ट्रातील हजारो तरुण युवक स्वयंप्रेरणेने दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.      

याठिकाणी होणार कृषीमहोत्सव:
परदेशात: जपान, फिनलँड, कॅनडा, नेपाळ या  ठिकाणी व परराज्यात: मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान-, छत्तिसगढ, गुडगाव, हरियाणा, कर्नाटक व गोवा,
महाराष्ट्रात तालुका-जिल्हा निहाय विविध ठिकाणी गाव-पातळीवर कमी-अधिक संख्येने सुमारे ९०० पेक्षाही अधिक ठिकाणी होणार. 

एकदिवसीय जागतिक कृषीमहोत्सवाचे वेळापत्रक तसेच या सप्ताहात होणाऱ्या विविध तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रांबाबत विस्तृत माहिती www.krushimahotsav.org या वेबसाईटवर किंवा Krushi Mahotsav या अँपवर उपलब्ध आहे. तसेच जागतिक कृषीमहोत्सव सप्ताह दरम्यान होणाऱ्या विविध मार्गदर्शन व चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी युट्युब चॅनेलला भेट देऊन सबस्क्राईब करा.

थेट बांधावर होणाऱ्या कृषीमहोत्सवाचे स्वरूप खालील प्रमाणे : कोरोनाच्या संदर्भातील अडचणी लक्षात घेऊन सोशल डीस्टन्स ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, योग्य प्रकारे सॅनीटायझरचा वापर करणे अशी सर्वप्रकारची काळजी घेऊनच जागतिक कृषीमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

१० ते १५ गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोणत्याही एका शेताच्या बांधावर कृषी महोत्सवातील शक्य असणाऱ्या उपक्रमांचे सकाळी १० ते ५ पर्यंत आयोजन केले आहे. ज्या शेतकरी बांधवांना या महोत्सवात सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्यांच्या जवळपासच्या कृषीमहोत्सवात सहभाग नोंदवावा स्थानिक ठिकाणी होणाऱ्या पिकांनुसार व शेतीस आवश्यक साहित्य निहाय कंपन्यांना देखील विविध ठिकाणी सहभाग घेता येईल एकदिवसीय कृषीमहोत्सवामुळे दिवसभरात शेतकरी सोयीच्या वेळेनुसार सहभाग घेणार तसेच कृषीतज्ञांचे चर्चासत्र व शेतकरी वधू-वर परिचय मेळाव्यांचे ऑनलाईन नियोजन केल्याने गर्दी देखील होणार नाही.श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणीत शेतकरी उत्पादक कंपनी व इतर नामांकित कंपन्यांनासह  कृषीमार्ट अंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या कृषी महोत्सवात कृषीमार्टचे प्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी नाव-नोंदणी करणे

या सप्ताह कालवधीत देशी बि-बियाणे,पर्यावरण,दुग्धव्यवसाय,गौसंवर्धन,कृषी शेतीतील प्रक्रिया उद्योग,जोडधंदे अशा विविध विषयांवर ऑनलाईन विचारमंथन शेतकऱ्यांच्या मुला – मुलींसाठी सुयोग स्थळे ऑनलाइन शेतकरी वधू – वर परीचय मेळ्याव्यात उपलब्ध होणार समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना योग्य व्यावसायभिमुख मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे दृष्टीने स्वयंरोजगार प्रतिनिधींकडे नाव – नोंदणी करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here