श्रीरामपुर/प्रतिनिधी :- वीज बिलांचा प्रश्न खूपच गंभीर बनत चालला आहे. लॉकडाऊन काळात भरमसाठ रकमेची वीज बिलं आकारण्यात आल्याने ग्राहकांना मोठा हादरा बसला आहे. वीजवापर कमी असतानाही असंख्य ग्राहकांना सरसकट बिले आकारण्यात आली आहेत. याबाबत महावितरणकडून कोणतेच समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दत्तनगर च्या विविध भागांत या प्रश्नावर भीमशक्ती माध्यमातून आंदोलने करण्यात येत आहेत. दत्तनगर मध्ये तर सातत्याने हा प्रश्न ऐरणीवर आणण्यात येत असून आज महावितरण कर्मचारी यांनी काही भागात वीज पुरवठा खंडित केला होता त्यावेळी तेथील नागरिकानी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांना फोन लावला त्यावर संदीप मगर त्वरित त्या ठिकाणी पोहोचले कर्मचारी बरोबर अतिशय खडाजंगी करत त्वरित वीज पुरवठा चालू करावा अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल अशे बोलताच कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा चालु केला अशा आंदोलनाच्या माध्यमातून महावितरणला मोठा झटका देण्यात आला आहे. पुढे बोलताना संदीप मगर यांनी सांगितले वीज ग्राहकांनो, गेली दोन दिवस विविध समाजमाध्यमांद्वारे थकित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासंबधिच्या बातम्या आपल्या कानी पडत आहेत आणि वीज पुरवठादारांनीही (महावितरण) उर्जा मंत्री महोदयांच्यां भाषणाचा आधार घेत तत्परतेने थकित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे परंतु, वीज पुरवठादारास (महावितरण) अचानकपणे थकित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करता येतो का? हे एक सुज्ञ ग्राहक या नात्याने समजून घेणे गरजेचे आहे. हो, वीज पुरवठादार (महावितरण) थकित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करू शकतो. परंतु, याकरीता वीज पुरवठादारास (महावितरण) वीज अधि्ांनियम 2003 च्या कलम 56 नूसार थकित वीज ग्राहकास ‘‘वीज देयक रकमेचा भरणा करण्यात कसूर केल्या कारणे आपला वीज पुरवठा खंडित करणार आहोत ’या आशयाची लेखी नोटिस वीज पुरवठा खंडित करण्याच्या किमान पूर्ण 15 दिवस अगोदर देणे गरजेचे आहे. सदर नोटिस महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेत म्हणजेच मराठी भाषेत असणे अनिवार्य आहे. (मराठी भाषा विभाग परीपत्रक मभावा-2019/प्र.क्र.22/भाषा-2 दिनांक 29 जून 2020) कोविड 19 च्या जागतिक महामारीमुळे उद्धभवलेल्या अर्थिक संकटाच्या परीस्थितीमूळे महावितरणने थकीत वीज ग्राहकांसाठी सुलभ हप्त्यांची सोय करुन दिलेली आहे. (महावितरण वसूली परीपत्रक 19408 दिनांक 13 नोव्हेंबर 2020). ज्या ग्राहकांना अर्थिक संकटामूळे एकरकमी वीज देयक भरणे शक्य नसेल ते ग्राहक या सूविधेचा लाभ घेत होणारी संभावित वीजतोड रोखू शकतील. या योजनेचा लाभ घेण्याकरीता आपल्या गावातील वायरमेनशी संपर्क करावा.

वीज पुरवठादारास थकित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करावयाचा असल्यास वीज अधि्ांनियम 2003 च्या कलम 56 चे पालन करुनच वीज पुरवठा खंडित करता येतो. वीज अधि्ांनियम 2003 चे पालन न करता वीज पुरवठादाराने केलेली कारवाई अनाधिकृत मानन्यात येईल व वीज ग्राहकास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग विनियम 2014 प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल. नुकसान भरपाई मिळण्याकरीता ग्राहकास विहीत नमून्यामध्ये (फॉर्म-क्ष) तक्रार करणे गरजेचे असते. याकरीता तक्रार अर्ज (फॉर्म-क्ष) सर्व वीज वितरण कार्यालयांमध्ये निशुल्क मिळतो. आपण थकित वीज ग्राहक असाल तर आपणास वीज अधि्ांनियम 2003 नुसार किमान 15 दिवसांचा अवधि अथवा सुलभ हप्त्यांची सोय मिळत असल्याकारणाने घाबरुन जाण्याची गरज नाही.
ग्राहकांनो अधिकारांसोबतच जबाबदारीही ओघाने येतेच आणि अचूक मिटर रिंडंगप्रमाणे आलेले वीज देयक वेळेवर भरणे ही वीज ग्राहकांची अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही.

आपणास वरील विषयास अनूसरुन काही तक्रार असल्यास अथवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या संघटनेशी किंवा पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here