श्रीरामपुर/प्रतिनिधी :- अतिशय गरीब कुटुंबातील टिळकनगर कामगार संघटनेचे सदस्य श्री रमेश कोल्हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाल्याचा आनंद मित्रांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात तालुक्याच्या एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्याने टिळकनगर कामगार संघटनेने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

एकलहरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गमती जमती सह चुरसही पाहायला मिळाली. टिळकनगर कामगार संघटनेचे सदस्य श्री रमेश कोल्हे हे विजयी झाल्यानंतर त्यांचा सत्कार केला असता त्यांना खुप आनंद झाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

या वेळी मोठा कामगार वर्ग उपस्थित होता संघटनेचे अध्यक्ष- बबन माघाडे जनरल सेक्रेटरी – नंदू गंगावणे उपाध्यक्ष – विक्रम भुजंग सह सेक्रेटरी- युसुफ भाई शेख खजिनदार – दिलीप मोहळकर सह खजिनदार- रावसाहेब खरे सदस्य- महेबुब पठाण, रामदास जाधव, शांतवन सोनावणे. रमेश भालेराव, अमोल शिंदे, विलास गिरमे, भाऊसाहेब ठोंबरे. सतीश कुलकर्णी नंदू फटांगरे, आदी सह संदीप दळवी ,दीपक आपिल, प्रवीण पठारे, रोहित आगळे. बाळासाहेब ढोकचोवळे ,गोविंद गिरमे, रशिंकर या बरोबर परिसरातील नागरिक उपस्थित होते. तर आभार अध्यक्ष बबन माघाडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here