श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- श्रीरामपुर येथील कै. ला. संजय डंबीर यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूर, युनिटी व लायन आय हॉस्पिटल, बाबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जानेवारी सोमवार या दिवशी श्रीरामपुर शहरातील दत्तनगर गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच ब्लडशुगर (डायबेटीस) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूर, युनिटी व लायन आय हॉस्पिटल, बाबा प्रतिष्ठान हे शहरांमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत असून त्यांच्या सामाजिक सेवा व वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्याच निमित्ताने श्रीरामपुर येथील कै. ला. संजय डंबीर यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूर, युनिटी व लायन आय हॉस्पिटल, बाबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तनगर ग्रामपंचायत याठिकाणी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया तसेच ब्लडशुगर (डायबेटीस) तपासणी करण्यात येऊन ५०० रुग्णांना शिबिराचा लाभ घेता आला.

मोतीबिंदू – डोळ्यातून पाणी येणे चक्कर येणे टेरिझीयम (डोळ्यातील पडदा, नेत्रपटल) भुरकट – धुरकट दिसणे डोळ्यात लाली असणे लासुर डोळ्यात टीक-फुळ असणे कमी दिसणे काचबिंदू (ग्लॉकोमा) वारंवारची डोकेदुखी अजिबात न दिसणे डोळ्यामधील तिराळेपणाची तपासणी वरील लक्षणे अथवा विकार असणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी केली असून ग्लुकोमीटरवर रक्‍तातील साखर तपासणी केली ज्यांना साखरेचा त्रास असेल त्यांना पुढील मोफत मार्गदर्शन केले


यावेळी डॉ अजिंक्य शिंदे, रमेश मकासरे, नामदेव जगताप तपासणी करून व त्यांच्यावर औषध उपचार मोफत मध्ये करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून ला. प्रविण गुलाटी(उपक्रम प्रमुख), डॉ.निशीकांत चव्हाण (व्हा.चेअरमन), ला.रविंद्र गदिया(खजिनदार), ला.चेतन भुतडा(सचिव), डॉ.भारत गिडवाणी(चेअरमन), ला. अहिलाजी खैरे (अध्यक्ष), भरत ओझा, विनोद रोहेरा, सुनिल साठे, पुरुषोत्तम झंवर तसेच लायन्स क्लब श्रीरामपूर, युनिटी हॉल क्लिनीक प्रा.लि.श्रीरामपूर श्री.बाबासाहेब दिघे (मा.सभापती जि.प.,अहमदनगर), श्री.सुनिलभाऊ शिरसाठ ( लोकनियुक्त सरपंच, दत्तनगर),श्री.प्रेमचंद कुंकूलोळ (मा. उपसरपंच), श्री.नानासाहेब शिंदे (मा. उपसरपंच) श्री.मुक्‍तारभाई शहा(नगरसेवक), शहाजान बागवान, हिरामन जाधव, बाळासाहेब विघे, सुरेश जगताप, संदिप बागुल,राजू खाजेकर, अरुण वाघमारे, किरण खंडागळे, अशोक लोंढे, रविअण्णा गायकवाड, संदिप मगर, कैलास पगारे, भिमाभाऊ बागुल, मोहन आव्हाड, प्रदिप गायकवाड, राजु गायकवाड (पो.पा.), राजेंद्र गायकवाड सतिष म्हसे सर संजय बोरगे संजय कोळगे यांची उपस्थिती होती.

या शिबिरासाठी बाबा प्रतिष्ठान अध्यक्ष सुनिल जगताप (सर), संजय शिरसाठ,दिनेश तरटे (सर), सुनिल उबाळे (सर), सुरेश शिवलकर सिध्दार्थ स्पोर्टस्‌ , श्री दत्त तरुण मंडळ, दत्तनगर अकॅडमी, शरद भणगे व लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here