श्रीरामपुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर पोलीस स्टेशनला नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी कामकाजाच्या दुसऱ्याच दिवशी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोकॉ गौरव राजेंद्र दुर्गुळे यांच्या फिर्यादी वरून वार्ड नंबर ७ पूर्णवाद नगर येथील आरोपी निरज वैद्य हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने घेवुन फिरत आहे असे लक्षात आले श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस काँन्स्टेबल राहुल नरोडे यांनी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे शोध घेतला असता निरज वैद्य हा संशयास्पद फिरताना आढळून आला त्याची अंग झडती घेतली असता त्याचे पॅन्टचे डावे बाजुला कमरेजवळ खोसलेला एक गावटी कट्टा मिळुन आला त्यानंतर पोनि/सानप यांनी त्यास शस्त्र परवाना आहे काय ? असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले, नमुद गावठी कट्टयाचे वर्णन खालीलप्रमाणे.
१) २५,०००/- रु.कि.चा एक गावठी बनावटीचा पांढऱ्या धातुचे आवरन असलेला,मुठीला दोन्ही बाजुला प्लॅस्टीकची ग्रीफ असलेला मॅगझिन सह. २) ३००/- रु.कि.चे एक जिवंत काडतुस त्यावर KF ७.६५ अशी अक्षरे व अंक असलेले मॅगझीनमधील. २५,३००/- एकुण असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांच्या विरुध्द आर्म आँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात काम चालु होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here