शेवगाव/प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्ह्यात काही केल्याने गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही.अशातच अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जवळील मोकळ्या जागेत एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. यातील विशेष म्हणजे या मृतदेहाचे मुंडकेच कोणीतरी कापून घेवून गेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तेथेच एका 10 ते 15 वर्षीय मुलाचाही मृतदेह आढळून आला. मुंडके नसलेला महिलेचा व लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्यात कोणीतरी फोन करून माहिती दिली की, पाथर्डी रोडवर असलेल्या आयटीआय लगत मोकळ्या जागेत एक महिला मृत्यूमुखी पडली आहे. अशी माहिती समजताच शेवगाव पोलिस ठाण्याचे सपोनि.विश्वास पावरा , सपोनि. सुजीत ठाकरे, पोना. रवी शेळके, सुधाकर दराडे, अच्यूत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पोलिस पथकाने तेथे पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पाहणी केली असता एक 60 वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे या मृतदेहाला मुंडकेच नव्हते. पोलिसांनी आसपास तपास केला मात्र मुंडके आढळून आले नाही. मात्र तेथे आणखी एक 10 ते 15 वर्षील मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचपमाणे या महिलेल्या मृतदेहाशेजारी भांडी, पेटी, गोणपाट, काड्याकुड्या असे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

मृतदेहाला मुंडके नसल्याने ओळख पटविणे अवघड बनले आहे. यामुळे पोलिसांनी नगर येथील श्वान पथकाला पाचारण केले आहे मयत व्यक्ती भटक्या समाजाच्या असल्याने ईदगाह मैदानावर ते उघड्या मैदानात होते. तेथे असलेल्या एका पत्र्याच्या पेटीत पिवळ्या धातूचे मोठी घुंगरू व घंटा होत्या. त्यांचे संसारपयोगी वस्तु अस्ताव्यस्त पडल्या होत्या. दुपारी साडेचार वाजता श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र श्वान जागेवरच घुटमळल्याने माग निघू शकला नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.अजून मृत्यू अहवाल येणे बाकी असून शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती सुत्रांकडून कळत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here