कोरोणाच्या काळात अतिशय चांगले कार्य केलेल्या बद्दल चा सन्मान

शिर्डी/प्रतिनिधी :- सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 22जानेवारी 2021रोजी दुपारी 1वा हाँटेल जे के पॅलेस साई गोल्ड परीसरात शानदार सोहळा संपन्न झाला संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावसे होते सरपंच हा ग्रामविकासाचा घटक आहे यांनी असे कार्यरत करावे कि ते काम अस्मणिय राहील असे आवाहन समाजप्रबोधन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले शिडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखडे ग्रामसेवक युनियन चे राज्यध्यक्ष एकनाथ ढाकणे ,भाऊ मरगळे, विक्रम भोर, हरीप्रिया शुगर चे अध्यक्ष जयदिप वानखेडे कार्यकारी संचालक अंनत ऊर्फ बाळासाहेब निकम स्वागतध्यक्ष सरपंच प्रदीप हासे, सरपंच रविंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्रात सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र भर कार्यरत राहुन सरपंच यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यावर सरकार सोबत सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र एक आगळावेगळे उपक्रम राबवून सरपंच यांना एक आधार म्हणून सरपंच सेवा संघ कार्य करत आहे गेल्या अनेक वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श गावे निर्माण करण्यासाठी एक मोठा आराखडा तयार करून महाराष्ट्रात काही गावे निवडुण ग्रामविकासाचे काम गावोगावी जाऊन सुरू करणार आहे.विविध क्षेत्रातील पुरस्कार मानकरी कार्यकर्त्या चे भरीव योगदान कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल यंदाचे राज्यस्तरीय पुरस्कार. आदर्श सरपंच,उघोग भुषण,पत्रकारीता, युवारत्न, प्रशासकीय सेवा, सामाजिक, शैक्षणिक,कोरोणा, योध्दा, मिडीया, कृषी , व्यापार, कला,राजकीय, महसुल , वैद्यकीय, अध्यात्मिक, ऐतिहासिक,दिंव्याग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुत्रसंचलन प्रा.सोनाली म्हरसाळे ,इंजि युवराज सातपुते यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच सेवा संघाचे समर्थक युवा सामाजिक कार्यकर्ते शरदराव देवकाते यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here