राहता/प्रतिनिधी (गौरव डेंगळे) :- श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक अंतर्गत एक दिवशीय जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन नांदूर येथे श्री स्वामी समर्थ केंद्र नांदुर तसेच सर्व नांदूर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

या कृषी महोत्सवाचे उद्घाटन ह भ प उद्धव गिरीजी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना ह भ प उद्धवगिरी महाराज म्हणाले की श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून देशभरामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन नव्या पिढीला करून देत आहेत. हे प्रदर्शन म्हणजे फक्त प्रदर्शन नसूनहे म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन आहे.हा महोत्सव म्हणजे दर्शन व प्रदर्शनाचा वेळ म्हणजेच जागतिक कृषी महोत्सव. प पु अण्णासाहेब मोरे केंद्राच्या माध्यमातून देश कल्याणाचे काम करीत असून माझ्याकडं त्यांच्या महान कार्याला मनापासून शुभेच्छा.यावेळी श्री राजेंद्र गलांडे,श्री भैय्यासाहेब गोरे,सौ लिलाबाई गोरे,श्री राजेंद्र सोडणार, श्री नितीन गोरे,श्री कैलास गोरे,श्री बाळासाहेब घोरपडे,श्री प्रताप सरोदे,श्री कारभारी काने,श्री शेळके,श्री गणेश शेवंते,श्री विशाल तरकसे आदी मान्यवर उपस्थित होते.या कृषी प्रदर्शनांमध्ये भारत व कृषी सांस्कृतिक दर्शन,राष्ट्रीय कृषी प्रदर्शन,दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन,आधुनिक यंत्र व अवजारे प्रदर्शन,सण-उत्सवांची मांडणी तसेच अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन असे विविध उपकरण प्रदर्शित करण्यात आले आहे.

श्री साई चरित्र पारायण समाप्ती व जागतिक कृषी प्रदर्शन चे आयोजन एकत्रितपणे करण्यात आले होते यावेळी श्रीरामपूर तालुका,राहता तालुक्यातून बहुसंख्येने नागरिक प्रदर्शन बघण्यासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here