शिर्डी/प्रतिनिधी :- पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांना सोमवार दिनांक २५ जाने. रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहेत. विशेष म्हणजे ‘पोलीस ठाण्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली तर थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशा स्वरूपाचा फलक शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दहा दिवसांपूर्वी लावण्यात आला होता.

अधिक माहिती अशी की, शिर्डी पोलीस स्टेशन मधील कर्मचारी बाळासाहेब यशवंत सातपुते (वय ३८ रा शिर्डी), प्रसाद पांडुरंग साळवे (वय ४९) यांनी १७ जानेवारी ते २५ जानेवारी या काळात शिर्डी शहरात चालु असलेल्या हॉटेल वर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली होती. पण तक्रारदाराची लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्याने थेट नाशिक लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. त्याआधारे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक उज्वल कुमार पाटील, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाने शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये सापळा लावून बाळासाहेब यशवंत सातपुते याला दोन हजारांची लाच घेताना पकडण्यात आले, तर त्याचे सहकारी प्रशांत पांडुरंग साळवे यांच्या सांगण्यावरून ही लाच घेतली असल्याने या दोघांनाही लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गेल्या पंधरा महिन्याच्या काळात शिर्डी पोलीस स्टेशनचे जवळपास सात कर्मचारी लाच लुचपत विभागाने जेरबंद केलेत. काही दिवसांपूर्वीच शिर्डी पोलिस स्टेशन च्या उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक शिर्डी यांचे मोबाईल नंबर नाव टाकून जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर संपर्क साधावा, असा फलक लावला असताना दहा दिवसात दोन कर्मचारी लाचलुचपत विभाग नाशिक यांनी कारवाई करून अटक केल्यामुळे अशा प्रकारचे फलक लावली तरी पोलिस कर्मचाऱ्यांचा पैशाचा मोह सुटत नाही हे जणू काही अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here