श्रीरामपुर/प्रतिनिधी :- खुनाचे गुन्हयातील अटक आरोपी यास हॉस्पीटल मधुन औषधोपचार घेवुन परत येत असतांना पोलीसांना गुंगारा देवुन पळुन जाणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेची यश आले

याबाबत अधिक माहिती अशी की पोहेकॉ/८९२ दत्तात्रय शिवाजी शिंदे, नेम. श्रीरामपूर तालुका पो.स्टे. यांनी दिलेल्या फिर्याद वरून श्रीरामपूर तालुका पो.स्टे. गुरनं. ७२/२०२० भा. द. वी. कलम ३०२,३२४ ४३६,५०६,३४ या गुन्हयातील आरोपी नामे सचिन नेमजी काळे, रा. मुठेवाडगाव ता. श्रीरामपूर यांच्यावर ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर येथे वैदयकीय तपासणी व औषधोपचार घेवुन त्यांना परत श्रीरामपूर येथे घेवुन जात असतांना श्रीरामपूर ते हरेगाव जाणारे रोडवर वाहनाचा वेग कमी झाल्याचा फायदा घेवुन वाहनाचा मागिल दरवाजा उघडुन बेडीतील हात सोडवुन पोलिसांच्या ताब्यातुन पलायन केले होते. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी श्रीरामपुर शहर पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं ११८४/२०२०, भादवि कलम २२४,३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होते.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी हे नजरेआड झालेले होते. सदर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणेकामी मा. श्री मनोज पाटील, पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे आदेशाने पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्वतंत्र पथक नेमले होते. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली को, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी सचिन नेमजी काळे, रा. मुठेवाडगाव, ता श्रीरामपूर जि. अ.नगर, हा वास्तव्य बदलुन नारायणगाव, पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि. शिशिरकुमार देशमुख, पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ/भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, पोना/शंकर चौधरी, सचिन आडबल, पोकॉ/रणजीत जाधव, रविंद्र घुंगासे, रोहित येमुल अशांनी मिळून नारायणगाव, ता जुन्नर, जि. पुणे येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून मिळालेल्या माहितीचे आधारे सापळा लावून आरोपी नामे सचिन नेमजी काळे, वय ३९, रा. मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर जि. अ.नगर, मुळ रा. कौडगाव, ता पैठण जि. औरगाबाद यांस ताब्यात घेवून श्रीरामपूर शहर पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पो.स्टे. हे करीत आहेत.

वरील नमुद आरोपी सचिन नेमजी काळे याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

बिडकीन पो.स्टे. जि. औरंगाबाद गुरनं, 1 ३१/२००५, भादवि कलम ३९५ एम.आय.डी.सी वाळुंज पो.स्टे. जि. औरंगाबाद गुरनं.२१९७/२००६, डी १९४, कर्जत पोस्ट. जि. अ.नगर गुरनं, 1 ११५/२००७ भादवि कलम ३९४, ३४१ ३४ हवेली पो.स्टे. जि. पुणे प्रामीण गुरनं. 1 ८२/२००८, भादवि कलम ३९५,३९४,३३९३४ नारायण गाव पो.स्टे. जि. पुणे ग्रामीण गुरनं. ५/२०१०, भादवि कलम ४३९,३९९, ४०२ शेवगाव पो.स्टे. जि. अ.नगर गुरनं. 1 २५९/२०१४ भादवि कलम १४३, १४७, ५०४, ५०७, ३५३ श्रीरामपुर तालुका पो.स्टे. जि. अ नगर गुरनं. ७५/२०१७ मुप्रो का. कलम ६५ (ई) शि तालुका पो.स्टे. जि. अ.नगर गुरनं.२६३/२०१९ भादवी ३७६,३२३,५०४ पोस्को ३,४,६ तालुका पो.स्टे. जि. अ.नगर गुरनं. २२६/२०२० भादवी ३७९,३४ १४ श्रीरामपुर तालुका पो.स्टे. जि. अनगर गुरनं. 1 १५२/२०२० आर्म अँक्ट ४/२५ शहर पो.स्टे. जि. अ.नगर गुरनं. 1 ११८४/२०२० भादवी २२४,३४ पो स्टे. जि. अ.नगर गुरनं. ३८८/२०२० भादवी ३७९ श्रीरामपुर तालुका पो.स्टे. जि. अनगर गुरनं. ७२/२०२० भादवी ३०२,३२४ ४८६,५०६,३४ असे अनेक गुन्हेत सहभागी आहे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. दिपाली काळे मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा, श्री. संदिप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here