श्रीरामपुर/प्रतिनिधी :- आज प्रजासत्ताक दिनाच्या ओचित्या साधून श्रीरामपुर शहरातील दत्तनगर भागांतील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांच्या संकल्पनेतुन भारताचे संविधान लिहणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची गौरवगाथा पोवाडा गायण केलेल्या शाहीर किशोर सासवडे यांनी केले आहे

शहरातील पोलीस परेड ग्राउंड वर या सीडी चे लोकार्पण सोहळा पार पडला उपविभागीय अधिकारी अनिल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील, लोकप्रतिनिधी लहुजी कानडे, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मा. आमदार भाऊसाहेब कांबळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खान, दत्तनगर ग्रामपंचात सदस्य किरण खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, राजेंद्र कडू व शाहीर किशोर सासवडे असे अनेकांचे प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला

सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी पुढे बोलताना सांगितले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही या सीडी ची निमित्ती केली आहे तरी आपण ही सीडी नक्की ऐकावी अशी विनंती केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here