श्रीरामपुर/प्रतिनिधी :- राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ऊर्जामंत्री व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावी यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले त्याच अनुषंगाने श्रीरामपूर येथील पदाधिकाऱ्यांनी देखील शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी मनसेच्या वतीने सांगण्यात आले की लोकांच्या कालावधीमध्ये लोकांच्या हाताला काम धंदा नसल्याने आर्थिक आर्थिक उत्पन्न असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेले होती सर्व वीज ग्राहकांचे विज बिल माफ करण्यात यावी असे संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेऊन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीच्या सणाच्या वेळेस तमाम महाराष्ट्रातील जनतेला वीज बिलामध्ये सवलत देऊन गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले होते त्यामुळे नागरिकांनी लाईट बिल भरला नाही परंतु ज्यांनी मंत्रीमहोदयांच्या शब्दावर विश्वास ठेवून लाईट बिल भरला नाही आशा नागरिकांना भरमसाठ व्याज लावून पुन्हा जास्तीचे लाईट बिल पाठविण्यात आले तसेच काही दिवसापूर्वी संबंधित मंत्र्यांनी व अधिकार्‍यांनी लाईट बिल शक्तीचे वसूल करावे व जे लोक लाईट बिल भरणार नाही अशांचे लाईट कट करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत तसेच उर्जा सचिव व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात ‘संगनमत करुन मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणुक केल्याचा गुन्हा’ दाखल करण्यात यावा आसे श्रीरामपूर येथील पोलीस निरीक्षक संजय सानप यांना लेखी स्वरुपात तक्रार व निवेदन देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर च्या वतीने करण्यात आली आहेत्याप्रसंगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष तुषार बोबडे जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप उपजिल्हाध्यक्ष उदय उदावंत उपजिल्हाध्यक्ष मनविसे सुभाष सोनवणे तालुकाध्यक्ष गणेश दिवसे शहराध्यक्ष राहुल दातीर तालुकाध्यक्ष मनविसे विशाल शिरसाठ शहराध्यक्ष मनविसे, कामगार सेनेचे सरचिटणीस नंदू गंगावणे, निलेश सोनवणे शहर संघटक,अमोल साबणे तालुका सचिव,भास्कर सरोदे तालुका उपाध्यक्ष, सागर इंगळे, संकेत शेलार, प्रमोद शिंदे, गणेश राऊत शहर उपाध्यक्ष, अक्षय सूर्यवंशी मनविसे शहर सचिव, विकास शिंदे, अतुल तारडे, मारुती शिंदे, करण कापसे, सागर त्रिभुवन, सतीश कुलकर्णी, बाबासाहेब भालेराव, बापु लबडे, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here