श्रीरामपुर/प्रतिनिधी :- माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे व प्राईड अकॅडमी संचालिका तथा पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर-वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड अॅकेडमी इंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनि. कॉलेज, वांगी-भेर्डापूर येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटना अध्यक्ष व कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी श्री. बाळासाहेब पटारे व सौ. अनुराधा पटारे यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमासाठी योगेश उंडे, संजय इंगळे, सोपान गोरे, रमेश साळे, गणेश कवडे, आदी मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विचार मांडले. यानंतर महाविद्यालयात पार पडलेल्या घटक चाचणी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या गोटे प्रीती, प्राध्या. सुरेश कोकणे, प्राध्या. राजेंद्र गुजर व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे अस्मिता देवरे व हेमा गांधी यांनी केले तर प्राध्या. कोकणे यांनी आभार मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here