श्रीरामपुर/प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदवत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा काल एकदिवसीय संप करण्यात आला होता या संपामध्ये संपूर्ण राज्यभरातील चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांनी सहभागी होत आपल्या मागण्या शासन दरबारी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली.

या संपामध्ये श्रीरामपूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील सहभागी होऊन संपूर्ण राज्यभर होत असलेल्या संपला पाठिंबा दिला आहे.कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी श्रीरामपुर महसूल कर्मचारी संघटनेने काल संपात सहभाग घेतला. महसूल कर्मचाऱ्यांच्यावतीने श्रीरामपुर उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले

यावेळी सुधाकर भाडाईत, संदीप आल्हाट, नंदकिशोर सोनार, राजु निकाळे, नवनाथ मंडलिक, सुनिल देसाई, संजय चंदन, शरद गायकवाड श्रीमती शेहनाज शेख, मदन कु-हे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here