श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील 52 ग्रापंचायतीच्या सरपंचपदासाठी आड सोडत काढण्यात आली. यात तालुक्यातील अनुसुचित जाती महिलासाठी बेलापूर, टाकळीभान, मातुलठाण, अनुसुचित जमातीसाठी उक्कलगाव, उंदिरगाव, खंडाळा, नाऊर आणि कारेगाव, नागरिकांच्या मागासप्रवर्गात भेर्डापूर, महांकाळवाडगाव, खैरीनिमगाव, बेलापूर खुर्द, हरेगाव तर सर्वसाधारणसाठी पढेगाव, निपाणीवडगाव, वडाळा महादेव , मालुंजा, भोकर या महत्वपूर्ण ग्रामपंचायतीवर आरक्षण पडले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडत प्रशासकीय इमारतीत काल प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार गोवर्धने तसेच अधिकारी व कर्मचारीयांच्या उपस्थित प्रवर्गानिहाय आरक्षण सोडत जाहीर केले. तर प्रातांधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थित राखीव महिला सरपंच पदासाठी सोडत जाहीर केले. तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीपैकी अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी 13 सरपंच पदाच्या जागा राखीव ठेवल्या. अनुसुचित जमातीसाठी सहा तर नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 19 सरपंच पदाची सोडत काढण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील एकूण सरपंच पदाच्या 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या.
अनुसूचित जाती : गोवर्धनपूर (महिला), मातुलठाण, मांडवे, कान्हेगाव (महिला), ब्राम्हणगाव वेताळ, खिर्डी (महिला), खोकर (महिला), बेलापूर बुद्रूक, शिरसगाव (महिला), वांगी खुर्द (महिला), कुरणपूर, रामपूर, टाकळीभान (महिला). या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती : उक्कलगाव (महिला), उंदिरगाव, नाऊर, खंडाळा (महिला), कारेगाव, माळवाडगाव (महिला), कारेगाव.
नागरीकांचा मागास प्रवर्ग : भैरवनाथनगर (महिला), भेर्डापूर (महिला), भामाठाण (महिला), महाकांळवाडगाव (महिला), सराला, खैरीनिमगाव, दिघी (महिला), बेलापूर खुर्द (महिला), कमालपूर (महिला), गोंडेगाव, हरेगाव, नायगाव, मातापूर, मुठेवाडगाव. यांचा समावेश आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी : दत्तनगर (महिला), एकलहरे, कडित बुद्रूक (महिला), पढेगाव, फत्याबाद (महिला), गळनिंब, लाडगाव, निपाणी वडगाव (महिला), जाफराबाद (महिला), वडाळा महादेव, वांगी बुद्रूक, वळदगाव, मालुंजा, खानापूर, गुजरवाडी (महिला), भोकर (महिला), माळेवाडी (महिला), उंबरगाव (महिला), घुमनदेव. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
प्रारंभी प्रवर्गानिहाय आणि मागील आरक्षणाचा मागोव्यानुसार लोकसंख्येच्या आधारे घेवून सोडत काढली. शालेय विद्यार्थींनी भाग्यश्री जाधव हिच्या हस्ते सहा पैकी चार ग्रामपंयतीसाठी चिढ्या काढुन सोडत काढली. तर शालेय विद्यार्थी सार्थक पवार यांच्या अनुसुचित महिलासाठी आठ पैकी सात जागा हस्ते चिठ्ठी काढुन सोडत काढली.