श्रीरामपूर(वार्ताहर) – घर तेथे डांबरी रस्ता बनवला जात असुन आज प्रभाग ५ मध्ये सुमारे ४४ लक्ष रुपयाचे रस्ते खडीकरण व डांबीरकरण कामाचा शुभारंभ होत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.
येथील प्रभाग क्रमाक ५ मधील श्री जोशी यांचे घरापासुन ते शिंदे वस्तीपर्यंत व कौशल्यानगर अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे अंदाजे ४४ लक्ष रुपये कामाचा शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक बोलत होत्या.यावेळी प्रभाग ५ मधील ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब गागंड,ज्येष्ठ नेते भाऊसाहेब डोळस, शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख डॉ. महेश क्षिरसागर, नगरसेवक राजेद्र पवार, जितेद्र छाजेड, प्रकाश ढोकणे, रवी पाटील,रईस जहागिरदार, अलतमश पटेल, हंसराज आदिक, रवि खिलारी,चंद्रकात संगम, निखील सानप, नयन गांधी,नानाभाऊ गांगड, मधुकर देशमुख, नंदलाल गंगवाल, ऋुषिकेश नवले, ज्ञानेश्वर पटारे, एकनाथ आव्हाडे, सचिन देशमुख, दिपक गंगवाल, सर्जिराव देवरे,रविद्र कांबळे, संजय सोेनार, ऋषि चव्हाण, श्रीपाद बोराडे, वैभव रासने ,विजय शेलार, अभियांता गौरव यादव, यांच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्याने उपस्थित होत्या.
यावेळी नगराध्यक्षा आदिक म्हणाले, शहरात वर्षेभर कोविडमुळे विकास कामे होवु शकली नाही. आता कामाना प्रारंभ झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पालिकेस मोठ्याप्रमाणात निधी दिला आहे. देत आहे. मेनरोडचे काम अंतिम टप्यात आले आहे.
शिवाजीरोड ,संगमनेररोडचे काम ही लवकर सुरवात करत आहोत. शहरातील सर्वच प्रभागातील विकास कामाना प्रारंभ झाला आहे. सर्वानी साथ देयावी. शहर सुंदर बनवु. याभागातील नगरसेवक गांगड व डोळस यांनी सुमारे दोन कोट रुपयाचे काम या भागत केली आहेत. पुढे हि करु असे त्या म्हणाले.
यावेळी प्रभागातील नगरसेवक बाळासाहेब गागंड म्हणाले, या प्रभागात नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन कोट रुपयाचे विविध विकास कामे झाली आहे. भागातील प्रत्येक भागात रस्ता केला जात आहे. इतर ही विकासाचे काम केली जात आहे.
यावेळी स्वागत भाऊसाहेब डोळस यांनी केले तर सुत्रसंचलन सोमनाथ गागंड यांनी केले. आभार नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले