श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी दत्तनगर ते गणेशनगर रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी आजपर्यंत खड्डे मध्ये झाडे लावून खड्डे मध्ये झोपून खड्ड्यात बसून मुडंन आंदोलन केली पण सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हा परिषद, प्राधीकरण सगळे एकमेकाकडे बोटे दाखवत आहे पावसाळ्यात रस्त्यावर खड्डेचा अंदाज येत नसल्याने नियमितपणे अपघात घडत आहेत शिर्डी शिंगणापुर बायपास असल्याने नियमितपणे या रस्त्यावर लहान मोठ्या गाड्याची मोठी वर्दळ असते अनेक जन आता अस्तगाव रोडचा वापर करताना दिसत आहे कारण रस्त्यावरील मोठमोठी खड्ड्याचा सामना करण्यापेक्षा मौत का कुँवा मध्ये आले सारखे अनुभव या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या नियमितपणे येत आहे याआधीही शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे साहेब याची भेट घेतली परंतु काही उपयोग झाला नाही

दत्तनगर ते गणेशनगर रस्ते कामासाठी कानाडोळा करण्यात दीर्घकाळ होऊनही रस्त्याची दुरुस्ती होत नसेल या रस्त्याला आई बाप कोण आहे हेच समजत नसेल तर याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही त्यासाठी आज साई कॉर्नर येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले परंतु या आंदोनाची दखल घेत मा. जिल्हा परिषद सदस्य तथा सार्वजनिक बांधकाम बाबासाहेब दिघे यांनी लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याची डागडुजी चे काम केले जाईल अशी माहिती दिली



याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य तथा सार्वजनिक बांधकाम बाबासाहेब दिघे, दत्तनगर लोकनियुक्त सरपंच सुनिल शिरसाठ, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर, आप चे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुगरवाल, कामगार नेते नागेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे आदी सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here