श्रीरामपूर/प्रतिनिधी :- तालुक्याचे भूमिपुत्र माजी खासदार स्वर्गीय गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या, ८२ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्षा चषक या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची मोठ्या उत्साहात सांगता झाली.सदरच्या या स्पर्धेचे आयोजन श्रीरामपुरातील युवा कार्यकर्ते, एकता यंग सर्कलचे अध्यक्ष तोफिक शेख व एस एस क्रिकेट क्लब यांच्या पुढकराने करण्यात आले होते. या टेनिस बॉल स्पर्धेत ४० संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ज्यामधील फेन्ड्स इलेव्हन को-हाळे विरुद्ध सत्तार इलेव्हन कुरण या २ संघात चुरशीचा अंतिम सामना झाला. ज्यामध्ये सत्तार इलेव्हन कुरण संघाने ७५ धावांचे लक्ष. फेन्ड्स इलेव्हन को-हाळे यांच्या समोर ठेवले ७५ धावांचा पाठलाग करतांना ४ चेंडू आणि ८ गाडी राखून फेन्ड्स इलेव्हन को-हाळे संघाने विजय मिळवून नगराध्यक्षा चषकाचा बहुमान पटाकविल.या स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाशजी आदिक, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, डॉ. रवींद्र जगधने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, माजी नगरसेवक नजीर मुलाणी, योगेश जाधव, एकता यंग सर्कलचे अध्यक्ष तोफिक शेख, व एस एस क्रिकेट क्लबचे सलीम शेख, रईस जाहागिरदार, अलतमश पटेल, भाजपचे नगरसेवक दीपक चव्हाण, साजिद मिर्झा, जयंत चौधरी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here