शिर्डी/प्रतिनिधी :- साईबाबा येथे येणा-या भक्तां संदर्भात, एबीपी माझा या लोकप्रिय वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन ओझा तसेच मुकुल कुलकर्णी यांनी बातमीदारी केल्या नंतर , शिर्डी साईबाबा संस्थांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तब्बल २ महिन्यानी, वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीं विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, शिर्डी साईबाबा संस्थांने केलेली ही कारवाई राजकीय सुडा पोटी केली असून, या कारवाई मुळे पत्रकारांच्या अधिकारावर गदा येणार असल्याने, पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी संघटनेच्या वतीने केली असून, या संदर्भातील निवेदन , श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय याठिकाणी देण्यात आले.

यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष जयेश सावंत, प्रदेश उपाध्यक्ष किरण शिंदे, प्रभात शिंदे, राजेश बोरुडे, विठ्ठल गोरणे, निलेश भालेराव अभिषेक सोनवणे, असलम बिनसाद, स्वप्निल सोनार, ऋषीकेश पोळ, सचिन उघडे,अझर शेख, अल्ताफ जुनानी, कैफ मेमन, अफान कुरेशी, अकिब शेख, मोईज पठाण, सोहेल पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here