श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील दत्तनगर परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यां करिता नेहमी पुढाकार घेऊन आंदोलने करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांच्यावर शिर्डी येथून परत येत असतांना श्रीरामपूर वाकडी रस्त्यावरील एम आय डी सी परिसरातील यशवंत बाबा चौकी याठिकाणी तीन अज्ञात इसमांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अशोक लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सदर हल्ल्यात अशोक लोंढे यांच्या हातावर चाकूने वार केल्याने त्यांच्या हाताला गंभीर स्वरूपात जखम झाली असून अज्ञात आरोपीनी चाकु तसेच कट्टयाचा वापर केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध पक्ष तसेच संघटनेच्या पदाधिका-यांनी केलीय यावेळी उपस्थितांचा रोष पाहून पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी पोलीस रवाना केले त्यानंतर या प्रकरणी लोंढे यांच्या फिर्यादीवरून, भा. द. वी. कलम ३४१, ३२४, ३२३, ५०४,५०६ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. राशींकर, पो.कॉ. गुंजाळ करीत आहे. हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच आम आदमीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, दत्तनगरचे लोकनियुक्त सरपंच सुनील शिरसाठ, भिमाशक्तीचे संदीप मगर, रिपाईचे राकेश कापसे, नगरसेवक दीपक चव्हाण, प्राईम हयूमन राईटचे जिल्हाध्यक्ष अझहर शेख उर्फ ABS, मनसेचे शहर सचिव स्वप्निल सोनार, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे आदींसह सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here