माळवाडगांव/प्रतिनिधी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भामाठाण येथील श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे धर्मनाथ बीज उत्सव कोरोणाच्या नियमांचे पालन करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे महंत मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी दिली.

श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे ६ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त नवनाथ पारायण,श्रीराम कथा,प्रवचन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या उत्सवाची नियोजन बैठक संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी महाराज बोलत होते,अडबंगनाथ संस्थान येथे श्रीराम प्रभूंच्या अश्रूंची प्राचीन तपशीला आहे.तसेच अयोध्या येथे श्रीराम प्रभूच्या मंदिराची उभारणी देखील होत असताना अडबंगनाथ संस्थान येथे धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त देखील कोरोना संसर्ग काळात शासनाचे नियम पाळून श्रीराम प्रभूंच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी देखील तन-मन-धनाने धर्मनाथ बीज उत्सवास सहकार्य करावे.संस्थानमध्ये या नऊ दिवसाच्या उत्सवाच्या काळात भोजन,पाणी पुरवठा,संतांची व्यवस्था,प्रमुख पाहुण्यांचा सन्मान,मुक्कामी भाविकांची राहण्याची सोय,मंडप,साउंड सिस्टीम,भक्तनिवास आदी नियोजन करण्यासाठी समित्यांची निवड या आढावा बैठकीत करण्यात आली. अडबंगनाथ संस्थान भूमि ही नाथांची भूमी आपली समजून निष्काम भावनेने प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडून धर्मनाथ बीज सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, अडबंगनाथ संस्थान भामाठाण हे देशाच्या कानाकोपऱ्यात गाजत असून धर्मनाथ बीज सोहळा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या सर्वच भागात आपल्याला युट्युब चॅनेल द्वारे दिसणार असल्याचे देखील यावेळी स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी सांगितले.

या बैठकीस पो.पा.मधुकर बनसोडे,माजी पो.पा.वसंतराव मुठे,कैलास महाराज दुशिंग,अर्जुन आप्पा लोखंडे,दिलीप शेळके,सोमनाथ गोरे,अण्णासाहेब आसने,बबनराव लटमाळे,बाबासाहेब आसने,यशवंत हुरुळे,चोपदार भाऊसाहेब मुठे,लहानुभाऊ बनसोडे,रामनाथ सांगळे,सिताराम घोरपडे,लक्ष्मण आसने,जालिंदर आसने,योगेश गुरू,ठकसेन खंडागळे,पाचपिंड सर,लखन महाराज,पंकज खाडे,सोमनाथ भागवत,धर्मनाथ महाराज,रंगनाथ वर्पे,विलास बनसोडे,लोहकरे मामा,संजय बनसोडे,पत्रकार चंद्रकांत झुरंगे,विठ्ठलराव आसने,संदिप आसने यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here