श्रीरामपुर/प्रतिनिधी :- देशाचा प्रजासत्ताक दिन तसेच महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे ओचित्य साधत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर याठिकाणी, मानवता जीवन कल्याण सेवा भावी संस्था व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर तसेच अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिक व पोलीस प्रशासनातील सलोखा वाढविण्यासाठी टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन केले होते हा कार्यक्रम शहरातील पूर्णवाद नगर याठिकाणी घेण्यात आला होता या टेनिस बॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन शहरातील स्वयंवर मंगल कार्यलय याठिकाणी करण्यात आले होते सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकनियुक्त आमदार लहुजी कानडे यांनी स्वीकारले होते तसेच या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, राहुल मदने, पोलिस निरीक्षक सानप, मीनाताई जगधने, डॉ. प्रेरणा शिंदे, अविनाश आपटे, डॉ. जगधने, सारंगधर निर्मळ, अनिल साळवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, सर्वांसाठी कोरोना कठीण गेला.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व कर्मचारी व मानवता जीवन कल्याण सेवा भावी संस्थेचे पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here