श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातील भागात दरोड्याची तयारी करुन दरोडा घालण्यासाठी जात असलेली व चेन स्नॅचिंग करणारी श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी हत्यारे व वाहनासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक ०१/०२/२०२१ रोजी रात्री पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रिशीर माहिती मिळाली की श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगार आजम शेख हा त्याचे चार ते पाच साथीदारांसह दोन मोटार सायकलवरुन गोपिनाथनगर परिसरातून श्रीरामपूर शहराचे दिशेने कोठे तरी दरोडा घालण्यासाठी जात आहेत.

अशी माहिती मिळताच नॉर्दन ब्रँच जवळील भुयारी रेल्वे मार्गाजवळ सापळा लावण्यात आला कारवाई करणे साठी पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्याने पथकातील सपोनि/शिशिरकूमार देशमूख, सफो/नानेकर, पोहेकॉ/भाऊसाहेब काळे, विजयकूमार वेठेकर, मनोहर गोसावी, पोना/ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, शंकर चौधरी, विजय ठोंबरे तसेच चालक पोना/ चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून सरकारी व खाजगी वाहनाने श्रीरामपूर येथे जावून दोन पंचासह साई भुयारी रेल्वे मार्ग वार्ड नं. ३, श्रीरामपूर येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीनुसार रात्री २१/५५ वा. कारवाई करुन दोन मोटार सायकलवरील एकूण पाच इसमांना ताब्यात घेतले. सदर कारवाई वेळी एक इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. ताब्यात घेतलेल्या इसमांना पंचासमक्ष त्यांची नावे व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे व पत्ते १) रियाज शफी शेख, वय- २४ वर्षे, रा. वार्ड नं. ६, बस स्टँड मागे, श्रीरामपूर, २) आजम नसीर शेख, वय- २८ वर्षे, रा. गोपिनाथनगर, साई भुयारी मार्ग समोर, वार्ड नं. २, श्रीरामपूर, ३) करण अनिल अवचिते, वय- २२ वर्षे, रा. श्रीरामपूर बस स्टँड मागे, वार्ड नं. ६, श्रीरामपूर, ४) दानिश अयुब पठाण, वय- २० वर्षे, रा. एकतानगर, संगमनेर, ता- संगमनेर, ५) बाबर जानमहमंद शेख, वय- ४५ वर्षे, रा. अचानकनगर झोपडपट्टी, वार्ड नं. ९, श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले. तसेच पळून गेलेल्या साथीदाराचे नावं ६) बल्ली उर्फ बलीराम यादव, रा. श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले.वरील नमुद ताब्यात घेतलेल्या इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक स्टीलचा सुरा, लोखंडी कत्ती, स्टिलचा चाकू, एक लोखंडी कटावणी, मिरची पुड, चार मोबाईल, एक विना क्रमांकाची डिलक्स मोटार सायकल, एक अँक्टीव्हा मोपेड मोटार सायकल असा एकूण १,०३,५५०/-रु. किं. चा मुद्देमाल वाहने, हत्यारे व मोबाईल मिळून आल्याने ते जप्त करण्यात येवून सदरचे इसम हे बेकायदेशिररित्या आपले कब्जात हत्यारे बाळगून दरोड्याची तयारी करुन कोठे तरी दरोडा घालण्यासाठी जात असताना मिळून आल्याने सदर बाबत पोहेका/५७५ विजयकूमार वेटेकर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी श्रीरामपुर शहर पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. ६९/२०२१, भादवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील सखोल तपास श्रीरामपूर शहर पो.स्टे चे अधिकारी करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here