अहमदनगर व्हॉलिबॉल असोसिशनच्या वतीने १६ व १८ वर्षाखालील मुले मुली निवड चाचणी रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी ठीक सकाळी ११:०० वा श्रीरामपूर येथील महाले पोदार लर्न स्कूल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती क्रीडा शिक्षक श्री नितीन बलराज यांनी दिली.पात्र खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २००५ (१६ वर्षाखालील) व १ जानेवारी २००३ (१८ वर्षाखालील) असेल. निवड चाचणीसाठी घेणाऱ्या खेळाडूंनी खालील कागदपत्रे आपल्याबरोबर घेऊन यावे. mva फॉर्म, स्वतःचे ३ पासपोर्ट साईज फोटो, बोर्ड सर्टिफिकेट, ओळखपत्र, आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला, तसेच शाळेच्या किंवा महाविद्यालयाचा बोनाफाईड सर्टिफिकेट वरील सर्व कागदपत्रे बरोबर घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी श्री नितीन बलराज,श्री दत्ता घोरपडे, श्री प्रितम दुमाळे, श्री अविनाश चौखंडे, श्री नितीन गायधने आदिशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here