राहुरी/प्रतिनिधी :- येथील हॉटेल ऐश्वर्या मध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून दोन जणांसह हॉटेल चालकाला ताब्यात घेतले आहे.

तसेच तीन महिलांची सुटका केली. याच दरम्यान एका कॉलेज तरूणीला पळवून नेणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुरी तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. राहुरी बस स्थानक परिसरात काही महिला राजरोसपणे वेश्या व्यवसायासाठी येत होत्या. त्या ठिकाणी गिऱ्हाईकाचा शोध घेऊन हॉटेल ऐश्वर्या येथे गिऱ्हाईकाला घेऊन जात होत्या.

अनेक महिन्यांपासून व्यवसाय सुरू होता.याबाबत पोलिस प्रशासनाला खबर मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके व राहुरीचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, हवालदार लक्ष्मण बोडखे,पोलिस नाईक संजय जाधव, पी. सी.थोरात व महिला पोलिस कर्मचारी राधिका कोहकडे यांनी राहुरी बस स्थानकासमोर असलेल्या हॉटेल ऐश्वर्या येथे छापा टाकला. यावेळी दोन पुरूषांना आणि हॉटेल चालकाला ताब्यात घेतले.

तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका केली. याच दरम्यान राहुरी येथील एक कॉलेज तरूणी राहुरी फॅक्टरी येथून राहुरीकडे येत असताना ती एका रिक्षामध्ये बसली. यावेळी रिक्षा चालक व एक महिला रिक्षामध्ये बसलेले होते. रिक्षामध्ये असलेल्या महिलेने त्या कॉलेज तरूणीचा गळा दाबून गप्प केले. रिक्षा राहुरी कॉलेजजवळ आली.

यावेळी त्या तरूणीने चालत्या रिक्षामधून उडी मारली. मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी विकी शिंदे, संकेत तनपूरे, सुजीत पटारे, आकाश गुलदगड, सुनिल लावरे या कॉलेज तरूणांनी त्या तरूणीला धीर दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या कॉलेज तरूनीला ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here