श्रीरामपुर/प्रतिनिधी :- ६ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या खासदार गोविंदरावजी आदिक सभागृह हे मागील ४ वर्षांपासून अग्निशमन दलाच्या न हरकत दाखल्यामुळे श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर घालणारी मोठी वास्तू बंद अवस्थेत आहे पर्यायी त्यामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळत नसल्याने अनेक कलाकारांना इतर व्यवसाय करावे लागत आहेत.



कलाकारांच्या व्यथांचे कुठलेही गांभीर्य श्रीरामपूर नगर पालिकेच्या सत्ताधा-यांना न राहिल्याने अखेर शहरातील कलावंतांनी पालिके विरोधात आंदोलनाचे शास्त्र उपसले. या आंदोलना दरम्यान पालिकेच्या गेट समोर शहरातील कलावंत तसेच काँग्रेसचे उपनगराध्यक्ष करण ससाणे , माजी नगराध्यक्ष व नगरसेवक संजय फंड, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, सचिन गुजर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी मुख्याधिकारी यांना एका दैनिकात आलेल्या बातमीचा खुलासा करुन सदर सभागृहासाठी लागणारी अग्निशमन न हरकत दाखला नसतांना लोकार्पण सोहळयाच्या बातम्या कशा दिल्या याची चौकशी करून आंदोलकांना सभागृह खुले करून दाखवावे अन्यथा आम्ही कुलूप तोडून आत प्रवेश करू असा इशारा दिल्याने मुख्याधिकारी शिंदे यांनी नाट्यगृह खुले करून दाखविले यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी ,पालिकेच्या निष्क्रिय कारभारा विरोधात ताशेरे ओढत जोरदार टीका केलीय



याप्रसंगी नवनाथ कर्डीले, अजय घोगरे, अजय धाकतोडे, बंदुकुमार शिंदे, विनोद वाघमारे, गणेश ससाणे, कासीम सय्यद,नाना कर्डीले, प्रकाश ढोणे, संदीप कदम, दिप्तेश विसपुते,रवींद्र जावरे, राहुल उपाध्ये, जुनेद सय्यद,सचिन जावरे, सौरभ संकपाळ,गणेश मगरे,गणेश करडे,अर्जुन तिरमखे,अमोल चिलखा,विवेक माटा,राजू बाणेदार,सागर म्हस्के आदि श्रीरामपूरातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here