श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) – नगर जिल्ह्यातील क्रीडाविश्वातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून क्रीडाशिक्षक नितीन बलराज यांचे नाव घेतले जाते. श्री बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थ्यांनी हॉलीबॉल क्रिकेट व विविध खेळांमध्ये तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत अलौकिक अशी कामगिरी केली आहे .त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन छत्रपती प्रतिष्ठान उंबरे यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा या वर्षीचा जिल्हास्तरीय छत्रपती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला .

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने नितीन बलराज यांचा सत्कार समारंभ करण्यात आला .महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री जंगले म्हणाले शिक्षक नितीन बलराज यांना मिळालेला पुरस्कारामुळे सर्व श्रीरामपूर आतील खेळाडूंचा सन्मान आहे .पुरस्कारांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री विनोद जोशी यांनी आपल्या मनोगतातून यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या .
सत्कारास उत्तर देताना श्री बलराज म्हणाले की महासंघाने केलेल्या सत्कारांमुळे अधिकाधिक काम करण्याचे बळ मिळाले आपल्या कौतुकाची थाप माझ्यासाठी सर्वाधिक प्रेरणा देणारी आहे असे म्हटले .

सत्कार समारंभाच्या वेळी श्री विजय शिंदे,शिक्षक श्रीकांत लांडे तसेच क्रीडाशिक्षक गौरव डेंगळे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here