श्रीरामपुर/प्रतिनिधी :- ६ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या खासदार गोविंदरावजी आदिक सभागृह हे मागील ४ वर्षांपासून अग्निशमन दलाच्या न हरकत दाखल्यामुळे श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर घालणारी मोठी वास्तू बंद अवस्थेत आहे पर्यायी त्यामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळत नसल्याने अनेक कलाकारांना इतर व्यवसाय करावे लागत आहेत.



कलाकारांच्या व्यथांचे कुठलेही गांभीर्य श्रीरामपूर नगर पालिकेच्या सत्ताधा-यांना न राहिल्याने अखेर शहरातील कलावंतांनी पालिके विरोधात आंदोलनाचे शस्त्र उपसले. या आंदोलना दरम्यान पालिकेच्या गेट समोर शहरातील कलावंत भाजपा सांस्कृतिक आघाडी चे जिल्हाध्यक्ष बंडकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर नगरपरिषद चे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. पुढे बोलताना बंडकुमार शिंदे म्हणाले की आम्ही अनेक वेळा पालिकेच्या सत्ताधारी यांनी व या पाहिलेच्या मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिले आहे त्यानंतर आंदोलकांनी मुख्याधिकारी यांना एका दैनिकात आलेल्या बातमीचा खुलासा करुन सदर सभागृहासाठी लागणारी अग्निशमन न हरकत दाखला नसतांना लोकार्पण सोहळयाच्या बातम्या कशा दिल्या यांची विचारणा केली असता मुख्याधिकारी यांनी सांगितले याबाबत मला कोणतीही कल्पना नाही याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल तद नंतर आंदोलकांनी सभागृह खुले करून दाखवावे अन्यथा आम्ही कुलूप तोडून आत प्रवेश करू असा इशारा दिल्याने मुख्याधिकारी शिंदे यांनी नाट्यगृह खुले करून दाखविले

याप्रसंगी कलावंत भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक सेल बंडुकूमार शिंदे, नवनाथ कर्डीले, अजय घोगरे, अजय धाकतोडे, विनोद वाघमारे, गणेश ससाणे, कासीम सय्यद,नाना कर्डीले, प्रकाश ढोणे, संदीप कदम, दिप्तेश विसपुते,रवींद्र जावरे, राहुल उपाध्ये, जुनेद सय्यद,सचिन जावरे, सौरभ संकपाळ,गणेश मगरे,गणेश करडे,अर्जुन तिरमखे,अमोल चिलखा,विवेक माटा,राजू बाणेदार,सागर म्हस्के आदि श्रीरामपूरातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here