आंबी – पढेगाव येथील नेताजी सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल रेहाना गणी मुजावर उर्फ शेख मॅडम यांना समाजभूषण पुरस्काराने श्री श्री स्वामी रामदासजी महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रेहाना शेख ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगाव या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. विविध गुणदर्शन स्पर्धेत तालुका स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळवले आहे. रेहाना शेख यांनी स्वच्छ सुंदर शाळा, मुलींच्या जन्माचे स्वागत, महिला मेळाव्यातून महिला आरोग्य जागृती, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असे विविध उपक्रम राबविले आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वयक्तिक मार्गदर्शन केले. लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती केली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तसेच लोकवर्गणीतून शाळेची विकास कामे केली आहेत. त्यांना यापूर्वी पालकमंत्री राम शिंदे साहेब यांचे हस्ते नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, पंचायत समितीच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल पढेगाव येथील नेताजी फाउंडेशन चे संस्थापक रणजित दादा बनकर, मधुकर बनकर व त्यांच्या सर्व सदस्यांनी घेऊन रेहाना शेख यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली. त्यांच्या या यशाबद्दल पढेगाव पंचक्रोशीतील कान्हेगाव, लाडगाव व वळदगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here