माळवाडगाव (प्रतिनिधी) माळवाडगाव-कमालपुर रसत्यावरील माळवाडगाव शिवारातील भागचंद आण्णा आसने यांचा अडीच एकर,मिराबाई कडुबा आसने यांचा दिड एकर तर नंदा गोरक्षनाथ आसने यांचा ३० गुंठे ऊस जळुन ख़ाक झाला आहे. विजवितरणच्या गलथान कारभारामुळे या तीघा शेतकऱ्यांचे पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,माळवाडगाव शिवारातील कमालपुर रस्त्यावर भागचंद आण्णा आसने,मिराबाई कडुबा आसने,नंदा गोरक्षनाथ आसने यांनी उसाची लागवड केली असुन आता थोड्याच् दिवसात कारखान्याच्या गाळपास जाणारा हा ऊस आजच्या आगीत संपूर्णपने जळून ख़ाक झाला आहे.आसने यांच्या शेतात विजवितरणच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा पूर्ण पणे लोंबकळल्याने आसने यांनी विजवितरणच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना ही दिली होती मात्र नेहमीच्या सवयींप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने आजचे नुकसान घडून आले आहे. याबाबत शेतकर्यांमधुन संताप व्यक्त केला जात असुन असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी असतांना कुठल्याही शेतकऱ्यांची दखल या अधिकाऱ्याकडून।घेतली जात।नसल्याने विजवितरणच्या अधिकाऱ्यांबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आज शेतपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे उद्या कोणाचा जिव गेल्यास याला जबाबदार कोण ?असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. सदर उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अशोक सहकारी साखर कारखाना तसेच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले होते मात्र अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना ऊसाला लागलेल्या आगीबाबत कारखान्याचे कर्मचारी भाऊसाहेब आसने,सुरेश मदने आणि राजेंद्र मुठे यांनी कल्पना दिल्यानंतर अशोक सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी एन डी चौधरी आणि अॅग्री विभागाचे एस एस सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली असून या उसाला तोंड देण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती यावेळी शेतकी अधिकारी एन डी चौधरी यांनी पत्रकारांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here