मुंबई :- कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. करुणा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे कि,

मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती देखील सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

त्याचबरोबर पोलिसांनी याप्रकरणी आपल्यास सहकार्य केले नाहीतर आपण २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे सबंध असून त्यातून त्यांना दोन मुले झाल्याचं याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्य केलं होतं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here