श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातील पालिकेच्या सत्तांतरा नंतर शहरात विकासाच्या नव्या पर्वाचे स्वप्न दाखविणा-या नवीन सत्ताधारी नगरसेवक अकार्यक्षम असल्याने, शहरातील प्रभाग १२ मधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, या परिसरातील सेक्टर ४ व सेक्टर २ तसेच मिल्लत नगर परिसरातील नागरिकांना, नळ पट्टी, पाणी पट्टी तसेच पालिकेचे कर भरून देखील, सावत्र पणाची वागणूक दिली जात आहे. याठिकाणी ना सांडपाण्याच्या निसऱ्याची व्यवस्था, ना कचरा गोळा करण्यासाठी गाड्या, निवडणूक झाल्या पासून या भागातील नगरसेविका पतीचं, प्रभागातील काम काज पाहत असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्या एवजी, फक्त त्यांना झुलवत ठेवण्याचे काम ,प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुरू असल्याने, येथील नागरिक वैतागले आहेत, त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीवेळी अशा, बेजबाबदार आणि झुलवत ठेवणा-या नगरसेवकांना, निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ,असा इशारा या प्रभागातील नागरिकांनी दिलाय.
