माळवाडगाव: श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील -श्री श्री रविशंकर विद्यामंदिर ही शाळा सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात प्रयत्नशील असते. याअगोदर ही कोरोना महामारीच्या काळात कोरोनाचे निर्बंध पाळून तालुकास्तरीय टिचिंग, श्लोक पाठांतर स्पर्धा यांसारखे स्तुत्य उपक्रम शाळेने राबविले आहेत व त्यास भरपूर प्रतिसाद मिळाला.वार्षिक स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांस नवीन कलागुणांना वाव देण्याचा शाळेचा एक चैतन्यमय कार्यक्रम असतो .परंतु यावर्षी कोरोना मूळे कुठल्याही शाळेत हा कार्यक्रम घेता आला नाही. तरीही या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षकांच्या व पालकांच्या अविरत कष्टामुळे श्री श्री रविशंकर विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल वडाळा महादेव या शाळेने ऑनलाईन वार्षिक स्नेहसंमेलनाचे 7 फेब्रुवारी रोजी you tube वरआयोजन केले आहे.अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही महाराष्ट्रातील पहिली शाळा असून त्यास विद्यार्थ्यांचा व पालकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप कासार सर व मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे यांनी केले आहे.
You tube लिंक -SSRVM shrirampur
वेळ ७ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता यु ट्यूब वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here