श्रीरामपूर/प्रतिनिधी (गौरव डेंगळे) तालुक्यातील उक्कलगाव याठिकाणी मंगळवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १:३० वा विविध कार्यकारी सोसायटी उक्कलगाव येथे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुजचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र उक्कलगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

मनुष्य ही एकच जात माणुसकी हा एकच धर्म हे ज्ञान जगाला देणारे परमपुज्य गुरूमाऊली यांचे हितगुज धर्म, देश, प्रांत, सीमा भेदाच्याही पलीकडे उदबोधन करणारे, मानवी जीवनाचा सर्वांगीण परिपूर्ण विकास करण्याचा क्लृप्त्या सांगणारे, वास्तविक ग्राम अभियानातून संस्कृती जपून राष्ट्रीय विकासाची वृद्धी कशी वाढीस लावावी या अधिकृत अमृततुल्य हितगुजाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच याप्रसंगी परमपूज्य गुरुमाऊली सेवामार्गाच्या १८ ही विभागांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत. तरी प्रत्येक प्रतिनिधीने आपल्या सेवेचा अहवाल बरोबर ठेवावा व सर्व सेवेकरी व तालुक्यातील भाविकांनी अमृतुल्य हे हितगुजाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीरामपूर तालुका श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. या अमृततुल्य हितगुज कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी,कृपया सर्वांनी कोविड-१९ संदर्भातील नियमांचे पालन करून उपस्थित राहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here