श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर तालुक्यातील सर्व एसटी बस सेवा पूर्वीप्रमाणे चालु करण्याचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष हर्षल दांगट यांनी श्रीरामपुर आगार प्रमुख यांना दिले आहे . 

लॉकडाउन काळात महामंडळाची बस सेवा बंद होवून सुमारे ७-८ महिने झाले . २७ जानेवारी पासून जिल्हयात सर्वत्र ५ वी ते ८ वी च्या सर्व शाळा सुरु झाल्या आहेत . तसेच यापुर्वी ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु झाले होते. त्यामुळे शाळा – कॉलेज पूर्वी प्रमाणे सध्या नियमित सुरु झाले आहेत .श्रीरामपुर हे शैक्षणिक केंद्र असून येथे ग्रामीण भागातील अनेक खेड्यातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात त्यामुळे एस टी बस सुरू नसल्याने सध्या त्यांच्या शिक्षणाची गैरसोय होत आहे.

यासाठी श्रीरामपुर आगाराने तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या त्वरीत चालू कराव्यात अशी पालक , विद्यार्थी ,प्रवाशी आदींची मागणी जोर धरत आहे .ग्रामीण भागात एसटी बंद असून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने ही बस लवकरात लवकर चालू करणेची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी केली आहे

ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्याबाबत आगार प्रमुख श्री.शिवदे साहेब यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या वतीने निवेदन देताना तालुकाध्यक्ष हर्षल दांगट, गोपाल वायंदेशकर, सोहेल शेख,रोनित घोरपडे, विश्वास पटारे, योगेश पवार, सिद्धार्थ पवार, स्वप्नील जैन,विशाल बारसे यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here